सातारा : तीन दशकांची गौरवशाली परंपरा असलेल्या व सातारा येथून प्रकाशित होणाऱ्या गुंफण दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन संपादक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे.
सातारचा हा दिवाळी अंक महाराष्ट्रासह गोवा व सीमा भागात वाचकप्रिय आहे. यंदा गुंफणचा ३० वा दिवाळी अंक प्रकाशित होत असून त्यासाठी कथा, कविता, प्रवास वर्णन, माहितीपर लेख, विनोद, व्यंगचित्रे आदी साहित्य कागदाच्या एकाच बाजूस सुवाच्य अक्षरात लिहून अगर टाईप करून डॉ. बसवेश्वर चेणगे, नवीन गावठाण, किवळ रोड, मसूर, ता. कराड, जि. सातारा. पिन - ४१५१०६ या पत्त्यावर १० सप्टेंबरपर्यंत पाठवावे. दर्जेदार साहित्याला दिवाळी अंकात प्रसिद्धी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.