नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामकाज सुरु करावे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

by Team Satara Today | published on : 12 September 2024


सातारा : आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामाला लागावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

आगामी विधानसभा निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पोलीस उपअधीक्षक गृह अतुल सबनीस,  सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, नोडल अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक सर्व यंत्रणांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली. त्याच धर्तीवर येणारी विधानसभा निवडणूकही उत्कृष्टपणे पार पाडावी, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, या निवडणुकीसाठी 18 ते 19 वयोगटातील मतदारांची नोंदणी वाढावावी. त्यासाठी महाविद्यालये, विविध मंडळे यांचा सहभाग घ्यावा. घरोघरी सर्व्हेमध्ये जे मतदार मृत झाल्याचे आढळले आहेत त्यांची नावे तातडीने वगळावीत. दूबार मतदारांच्या नावाची खातरजमा करुन आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी. सर्व मतदार याद्यांचे पुनर्रिक्षण करावे. त्यासाठी बीएलओंच्या कार्यशाळा घ्यावात. ईपीक रेषो अपेक्षित ठेवावा. निवडणूक विषयक सर्व  प्रकारच्या अर्जांच्या पेंडन्सीचा तात्काळ निपटारा करावा. डाटा भरताना मतदान केंद्रांची नावे, त्यांची ठिकाणे, अक्षांश रेखांश, छायाचित्रे अचूक राहतील याची काळजी घ्यावी.

ज्या मतदारांची मतदान केंद्रे बदलेली आहेत, अशांना बदलाबद्दल अवगत करावे. मत मोजणी केंद्रांसाठी पुरेशा जागेची पहाणी करुन निवड करावी. यामध्ये वाहन पार्कीग, पोस्टल बॅलेट मोजणी, ईव्हीएम मशीनसाठी पुरेशी जागा असेल याची खात्री करावी. मत मोजणीसाठी ठिकाण निवडताना निवडणूक निर्णय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्त पहाणी करुन 17 सप्टेंबरपर्यंत आराखडा पाठवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी केल्या.

निवडणूक विषयक कामकाज करणाऱ्या मनुष्यबळाला आवश्यक प्रशिक्षण द्यावे. आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी यांनी दळवळण व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन, मनुष्यबळ प्रशिक्षण, मतदार यादी, साधन सामुग्री आदी सर्व विषयांबाबत  सूचना दिल्या.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आयुष्मान भारत स्वास्थ्य विमा योजना 70 वर्षांवरील सर्वांना सरसकट लागू करण्यात आली
पुढील बातमी
पंतप्रधान मोदी 15 सप्टेंबर रोजी दाखविणार 10 वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा

संबंधित बातम्या