साताऱ्यात सार्वजनिक पार्किंगमध्ये दारू प्राशन करणाऱ्या एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 May 2026


सातारा : राजवाडा बस स्टँडच्या पाठीमागील मंडईखालील सार्वजनिक पार्किंगमध्ये दारू प्राशन करताना एकास पोलिसांनी पकडले. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील सावंत यांना सार्वजनिक पार्किंगमध्ये राहुल राजू पवार (वय ३५, रा. ऐक्य प्रेस ८४ झोपडपट्टी, प्रतापगंज पेठ, सातारा) हा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये दारू पिताना आढळून आला.यावेळी पोलिसांनी राहुल पवार याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कंपनीचा विश्वासघात करून २० लाख ५१ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा
पुढील बातमी
श्रीराम साखर कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे चालवण्यास देण्याचा निर्णय; शासनाच्या मंजुरीनंतर अंतिम करार करण्याचा निर्णय घेतला जाणार

संबंधित बातम्या