माजी सैनिक व माजी सैनिकांच्या अवलंबितांनी जिल्हा सैनिक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : रक्षा लेखा महानियंत्रक यांचे मार्फत पी.सी.डी.ए (पेन्शन) यांची टीम स्पर्श प्रणालीबाबत माहिती देण्यासह जिल्हयातील युध्द विधवा, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा सैनिक कार्यालय, सातारा येथे उपस्थित राहणार आहेत.
 डिजिटल हयातीचे दाखले, मॅन्युअल हयातीचे दाखले, विविध सेवा जसे नॉमिनीच्या नावांत बदल, मोबाईल नंबर बदलणे, ई-मेल आयडी बदलणे, अद्ययावत करणे, कुटुंबातील अवलंबीतांचे जन्मदिनांक बदलणे वगैरे, सैनिकांचे मृत्यु बाबत माहिती देणे व कुटुंब निवृत्ती वेतन सुरु करणे आदी तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.   या सुवर्णसंधीचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थीनी घ्यावा असे आवाहन, ले. कर्नल डॉ भीमसेन चवदार (निवृत्त) मा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पदवीधर, पदविकाधारक तरुणांनी राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळार्फत कर्ज योजना - जिल्हा व्यवस्थापक सुशांत संघनवट

संबंधित बातम्या