विनापरवाना दहीहंडी उत्सव व मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 10 September 2026


सातारा : बुधवार नाका ते मोळाचा ओढा मार्गावर विनापरवाना दहीहंडी उत्सव भरवून मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल बाळासाहेब सावंत यांच्या फिर्यादीनुसार आदित्य सतीश गायकवाड आणि डीजे चालक रजनीकांत नागे यांच्यावर कारवाई करण्यात आली. दि. ९ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर स्टेज उभारून ध्वनिवर्धक यंत्रणा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
डीजेचा आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही तो सुरू ठेवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच उत्सवासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस हवालदार मोहरे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा एसटी स्टँड परिसरात पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
सदर बाजारातून अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेली

संबंधित बातम्या