सातारा : तब्बल दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23/9/2024 ते 12 जून 2025 दरम्यान रवींद्र पुरुषोत्तमदास शहा आणि मोहन पुरुषोत्तमदास शहा दोन्ही रा. मंगळवार पेठ, सातारा यांनी संगनमत करून 23/9/2024 च्या सभा नोटीस वर तसेच 30/9/2024 च्या प्रोसिडिंगवर ट्रस्टमधील इतर विश्वस्तांच्या खोट्या व बनावट सह्या करून बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरून श्री काळाराम मंदिर व हटकेश्वर देवस्थान ट्रस्ट, मंगळवार पेठ, सातारा मधील देवस्थानची दरे खुर्द, ता. सातारा येथील दीड कोटी किंमतीची अंदाजे चाळीस एकर जमीन देवस्थान ट्रस्ट व विश्वस्तांची फसवणूक करून, विक्री करून आलेल्या रकमेचा अपहार केला आहे. याबाबतची फिर्याद धवलचंद्र बाळकृष्ण दोशी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक म्हेत्रे करीत आहेत.