सातारा : अपघात प्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यान झालेल्या अपघात प्रकरणी आदित्य जगताप (रा.वेलंग ता.कोरेगाव) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दत्तात्रय दिलीप काटकर (वय 42, रा. त्रिपुटी ता.कोरेगाव) यांनी तक्रार दिली आहे. दि. 18 मार्च रोजी हा अपघात झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन दुचाकींचा अपघात झाला आहे.