सातारा : पिरवाडी येथे चैन स्नॅचिंग केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिरवाडी, सातारा येथे अज्ञाताने पायी चालत जाणार्या महिलेच्या गळ्यातील 1 तोळा वजनाचे 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रकार घडला. मात्र, झटापटीत संबंधित चोरट्याने गंठणाचा अर्धा भाग तोडून नेण्यात यश मिळवले. ही घटना दि. 20 डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी प्रमिला मकरंद शिंदे (वय 44, रा. गोरखपूर) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.