रक्षक प्रतिष्ठानच्या सुशील मोझर यांनी घेतली उदयनराजेंची भेट

by Team Satara Today | published on : 24 September 2024


सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची अनेक वर्षांनी रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन भेट घेतली. तब्बल दहा वर्षानंतर सुशील मोझर जलमंदिरात गेले. खा. उदयनराजे भोसले यांना पुष्पहार घालून केक कापत सुशील मोझर यांनी वाढदिवस साजरा केला.
खा. उदयनराजे भोसले यांचा अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता, मावळा म्हणून सुशील मोझर यांची ओळख राहिली होती. सध्या ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. खा. उदयनराजे भोसले यांना भेटण्यासाठी सुशील मोझर हे त्यांच्या पिरवाडी येथील निवास्थानापासून मंगळवारी दुपारी निघाले. त्यावेळी त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. खा. उदयनराजेंना पुष्पहार घालून सुशील मोझर यांनी बुके दिला. खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते केक कापून सुशील मोझर यांनी आनंद साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत सरकार कॅम्पसचे चंदन शिंदे हेही उपस्थित होते.
अनेक वर्षांच्या या भेटीनंतर सुशील मोझर माध्यमांना म्हणाले, खा. उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट झाली. त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. त्यामुळे त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहता आले नव्हते. खा. उदयनराजे यांना भेटून आशीर्वाद घ्यावेत, यासाठी ही भेट होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुमारे साडेचार लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा
पुढील बातमी
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्या : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

संबंधित बातम्या