करंजे पेठेतून सुमारे 67 हजारांच्या दागिन्यांची चोरी; शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 12 November 2026


सातारा : करंजे पेठेतून सुमारे 67 हजारांच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान किरण नारायण गोडसे रा. करंजे पेठ, सातारा यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने 26 ग्रॅम वजनाचे, 67 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय गोवेकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षक बँक ते तहसीलदार कार्यालय रस्त्यावर एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पुढील बातमी
वेणेगाव व पाडळी गावच्या हद्दीतअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी दोन जणांवर कारवाई

संबंधित बातम्या