सातारा : सातार्यात जिल्हा उद्योग केंद्र व औद्योगिक संचालनालय यांच्या वतीने गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे विविध कंपन्यांशी तब्बल 91 करार झाले या कंपन्यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात 3950 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामधून 9750 युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे त्यामुळे येथील औद्योगिक विकासाला मोठा बूस्टर मिळणार आहे.
या परिषदेमध्ये जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीविषयी चर्चा करण्यात आली. या परिषदेला उद्योग विभागाचे पुणे विभागीय सहसंचालक एस जी रजपूत, प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, एमआयडीसीचे अमित कुमार सांडगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेश दंडगव्हाळ, जिल्हा कामगार आयुक्त नितीन कवळे आणि मैत्रीच्या नोडल अधिकारी डॉक्टर प्रियदर्शनी सोनार उपस्थित होत्या.
या परिषदेमध्ये धोरणात्मक निर्णय गुंतवणूक संधी आणि राज्यातील औद्योगिक विकास यावर चर्चा झाली. स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांच्या आर्थिक क्षमतेवर भर देण्यात आला. त्यात महत्त्वपूर्ण गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या उद्दिष्टांचा भर असल्याचे शैलेश रजपुत यांनी सांगितले. त्यांनी एमआयडीसी सातारा टीमचे 1007 लक्ष पूर्ण केल्याबद्दल आणि राज्यातील सर्वोच्च टक्केवारी मंजुरी मिळाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन उमेश दंडगव्हाळ यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण म्हणाले जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे शिखर परिषदेत 91 उद्योजकांनी सातारा जिल्ह्यामध्ये स्वारस्य दाखवले आहे त्यामुळे येथे साधारण 3950 कोटी रुपयांची गुंतवणूक आगामी काळात होईल त्यामधून सुमारे नऊ हजार सातशे पन्नास लोकांना रोजगार मिळेल ही चांगली गोष्ट आहे. करार करणार्या कंपन्यांमध्ये रिलायबल रिन्युएबल 1000 कोटी इंडिया 500 कोटीशन टेक प्रायव्हेट लिमिटेड 250 कोटी, ट्यूब इन्वेस्टमेंट ऑफ इंडिया 200 कोटी, देवल फ्लो कंट्रोल 200 कोटी,शाश्वत पॅकेजिंग 200 कोटी अशा पद्धतीने गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.