सातारा : रिक्षातून जात असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी सकाळी पावणे नऊ ते सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान कमल सतीश कदम रा. मंगळवार पेठ, सातारा या जीवन ज्योत हॉस्पिटल, सातारा येथून रिक्षा मधून गौरीशंकर लॅब कडे जात असताना त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम 440 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोसावी करीत आहेत.