सातारा: सार्वजनिक रस्त्यावर दुचाकीजवळ बसून दारू पिणाऱ्या तरुणावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. राजतारा हॉटेल ते भोसले मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी हा प्रकार निदर्शनास आला.
आकाश विलास साळुंखे (वय ३१, रा. सारखळ, ता. सातारा) हा काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलीजवळ बसून प्लास्टिकच्या ग्लासमधून दारू पिताना आढळून आला. पोलिस कॉन्स्टेबल विशाल किसन धुमाळ यांनी याबाबत फिर्याद दिली.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे ४० हजार रुपये किमतीची एमएच-११-बीवाय-३५७६ क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली. संबंधितास कायदेशीर प्रक्रियेनुसार नोटीस बजावण्यात आली असून, शाहूपुरी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.