मान्सून प्रिन्स बास्केटबॉल स्पर्धेत शानबाग द्वितीय

रायझिंग स्टार सांची भोगावकर तर बेस्ट शूटर तनिष्का जाधव

by Team Satara Today | published on : 17 June 2025


सातारा : प्रिन्स युनायटेड बास्केटबॉल असोसिएशन आयोजित मान्सून प्रिन्स बास्केटबॉल चषक स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात मुलींमध्ये सातारा येथील शानबाग स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. कोल्हापूर येथील न्यू कॉलेज येथील बास्केटबॉल ग्राऊंडवर संपन्न झालेल्या या स्पर्धेत सातारच्या सांची भोगावकर हिला रायझिंग स्टार तर तनिष्का जाधव हिला बेस्ट शूटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी झाले होते. 

17 वर्षांखालील मुले शांतिनिकेतन (द्वितीय), ज्युनिअर कोल्हापूर (तृतीय) मुली शानबाग सातारा (द्वितीय), प्रिन्स युनायटेड ’ब’ (तृतीय) क्रमांक मिळविला. उत्कृष्ट खेळाडू संस्कृती जाधव (प्रिन्स युनायटेड), वरद फिरंगे (प्रिन्स युनायटेड), बेस्ट शूटर तनिष्का जाधव (सातारा), पार्थ चिले (प्रिन्स युनायटेड), बेस्ट रिबॉऊंडर शर्वरी चौगुले (प्रिन्स युनायटेड), रणवीर निंबाळकर (शांतिनिकेतन), बेस्ट डिफेंडर अमृता बनछोटे (प्रिन्स युनायटेड), ओंकार माने (प्रिन्स युनायटेड), रायझिंग स्टार सांची भोगावकर (शानबाग, सातारा), स्वराज खटावकर (प्रिन्स युनायटेड) ठरले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योगपती राजेश भोसले, उद्योगपती रणजितसिंह करंबे, प्रशांत साळोखे, राष्ट्रीय प्रशिक्षक केदार सुतार, प्रिन्स क्लब अध्यक्ष व्ही. जी. चोपडे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे संयोजन आशितोष खराडे, विश्वजित मोगणे यांनी केले. पंच म्हणून किशोर हवलदार, प्रतीक काशीद, आदित्य बोंगाळे, कुणाल पाटील, अमीर मुलांनी यांनी काम पहिले. तर निरीक्षक म्हणून अमित दलाल, नारायण पाटील यांनी काम पाहिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
पुढील बातमी
जावली तालुक्यात मारहाणीत एकाचा मृत्यू

संबंधित बातम्या