कराड : जमिनीच्या वादातून भावकितील युवकाच्या खूनाची घटना घडली. हेळगाव (ता. कराड) येथे आज सकाळी ही घटना घडली. जमिनीच्या वादातून भावकीतील युवकाला दांडक्याने बेदम मारहाण केली. सूरज भरत सूर्यवंशी (वय २८, रा. हेळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. बेदम मारहाण झालेल्या सुरजचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हेळगाव येथे सूरज सूर्यवंशी यांचा भावकीतील काही जणांशी जमिनीच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी सूरज यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापत झाली. जखमी सूरज याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मसूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
जमिनीच्या वादातून बेदम मारहाण झालेल्या सूरज सूर्यवंशीचा मृत्यू; हेळगाव परिसरात तणावाचे वातावरण
by Team Satara Today | published on : 20 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा