सातारा : प्रेमविवाह केल्यानंतर सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात एका युवकाच्या आत्महत्येनंतर दहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दहिगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील किरण महादेव ढवळे (३५) यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना घडली. त्यांच्या बहिणी शितल ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रेमविवाहाचा राग मनात धरून संबंधित नातेवाईकांकडून वारंवार मारहाण, धमक्या आणि पैशांसाठी तगादा लावण्यात येत होता. या सततच्या त्रासामुळे किरण यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.