बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 29 April 2025


सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 ते 25 दरम्यान बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असणाऱ्या हॉटेल प्राईडच्या समोरील पार्किंग मधून सुभाष चांगदेव राणनवरे रा. वनवासवाडी, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 सीएस 1842 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या