सातारा : इमारतीवरून पडल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी सातारा शहरातील एक अल्पवयीन मुलगी राहत्या घरी गॅलरीमध्ये काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने बेशुद्ध झाली. उपचारार्थ तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.