सातारा : सातारा जिल्ह्यातील साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य व्यासपीठ असलेल्या गुंफण अकादमीतर्फे सालाबादप्रमाणे प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे २४ वे वर्ष आहे.
अकादमीचे प्रमुख डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी ही माहिती दिली. मराठी साहित्यात नवीन विनोदी लेखन व लेखक यांची वानवा जाणवत असल्याने विनोदी लेखन व लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी अकादमीतर्फे ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी होत असतात. विजेत्या कथांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन विशेष समारंभात सन्मानित करण्यात येते.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखकांनी आपल्या सुटसुटीत विनोदी कथा कागदाच्या एकाच बाजूस सुवाच्य अक्षरात लिहून अथवा टाईप करून दि. ५ जुलैअखेर डॉ. बसवेश्वर चेणगे, मसूर, ता. कराड, जि. सातारा पिन ४१५१०६ किंवा विकास धुळेकर, एफ १७, गार्डन सिटी, राधिका रोड, सातारा पिन ४१५००१ या पत्त्यावर पाठवावी. जास्तीत जास्त लेखकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.