सातारा : दारू पिऊन पडलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 नोव्हेंबर रोजी रामदास सतीश भोंडवे रा. वनगळ, पोस्ट गोवे, ता. सातारा हे घरी चालत जात असताना दारू पिल्याने त्यांचा तोल जाऊन ते पडल्याने त्यांना उपचारासाठी पहिले सिव्हिल हॉस्पिटल सातारा, तेथून लगेच ससून हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.