दुचाकी अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 09 September 2024


सातारा : मोळाचा ओढा ते करंजे या दरम्यान दुचाकीवरून जाणार्‍या दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारदरम्यान मृत्यू झाला. संजय बबन बाबर वय 30 रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा असे मयताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी सकाळी मोळाचा ओढा ते करंजे या दरम्यान संजय बाबर दुचाकीवरून जात होते. यावेळी दुचाकीचा वेग अनियंत्रित होऊन गाडी डिव्हायडरला धडकली. या अपघातात बाबर जखमी झाले होते. मात्र त्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टर एस. आर. कणसे यांनी याबाबतीत सातारा शहर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. पोलीस हवालदार मोहरे अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन
पुढील बातमी
महाबळेश्वरमधील तिघांवर खाजगी सावकारी प्रकरणी गुन्हा

संबंधित बातम्या