सातारा : सातारा तालुक्यातील सासपडे येथील निलेश संजिवनी मधुकर फाळके यांची सामान्य प्रशासन विभागाच्या शासन आदेशानुसार अवर सचिव पदावरून उपसचिव पदावर पदोन्नती झाली आहे.
या आदेशानुसार त्यांची राज्यातील सुमारे ६ हजार खाजगी व्यावसायिक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘प्रवेश नियामक प्राधिकरण, मुंबई’ येथे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
फाळके यांनी यापूर्वी मंत्रालयातील गृहनिर्माण विभाग, जलसंपदा विभाग येथे कक्ष अधिकारी म्हणून तसेच आरोग्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग येथे अवर सचिव म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.
तसेच त्यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय शिवतारे, सध्याचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही कामकाज पाहिले आहे.
फाळके यांच्या या पदोन्नतीबद्दल पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. मकरंद पाटील, ना. जयकुमार गोरे, आ. मनोज घोरपडे, आ. महेश शिंदे आदी मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.