सातारा : सातारा शहरात एका ३१ वर्षीय महिलेने स्वतःचा आणि पतीचा विनयभंग व मारहाणीचा धक्कादायक प्रकार पोलिसांत नोंदवला आहे.
आरोपीने "येथे राहायचे नाही" असे म्हणून फिर्यादीच्या पतीला बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पतीला का मारता असा सवाल केल्यावर आरोपीने महिलेचा हात पकडत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असा आरोप फिर्यादीने केला आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल तरडे करीत आहेत.