पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणार- आ. सौ. हर्षदा देशमुख-जाधव; सातारा जिल्हा राष्ट्रवादीतर्फे सत्कार

निवडीनंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी जंगी स्वागत

by Team Satara Today | published on : 30 October 2026


सातारा : पदवीधरांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते मार्गी लावण्यासाठी विधान परिषदेमध्ये सातत्याने आवाज उठवला जाईल, अशी ग्वाही पुणे पदवीधर मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार सौ. हर्षदा देशमुख - जाधव यांनी दिली.
सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांचे निवडीनंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने  राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकजुटीने काम केल्याने आपल्याला ही संधी मिळाली आहे. पदवीधरांनी मोठा विश्वास माझ्यावर व्यक्त केला आहे. बेरोजगारीसह विविध प्रलंबित प्रश्नांवर पोटतिडकीने आवाज उठवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे सौ. हर्षदा देशमुख यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब पाटील म्हणाले,  पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम केल्यामुळे हर्षदा देशमुख यांचा विजय सोपा झाला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्राामाणिक प्रयत्न करावेत. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, कराड तालुकाध्यक्ष देवराज पाटील,पंचायत समिती सदस्य राजेश पवार, स्वप्नाली  फडतरे, प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे, सुवर्णा पाटील, नरेश देसाई, प्रवीण धसके, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, गोरखनाथ नलवडे,विक्रमसिंह फडतरे, जावळी तालुकाध्यक्ष सचिन गोगावले, युवक जिल्हाध्यक्ष समीर घाटगे,किसान सेल जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष शफिक शेख, असंघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष किरण चौधरी, तेजपाल वाघ, सुरेश पार्टे, नागेश साळुंखे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना देशमुख, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, मेघा नलावडे, नलिनी जाधव, उषा जाधव, प्रज्ञा गायकवाड, श्वेता काळंगे, शुभांगी निकम, सनी आवळे,  उमेश देशमुख, सातारा शहराध्यक्ष सुनील काळेकर, युवराज पवार, नवनाथ शेठ साबळे, तेजस्विनी केसरकर, पूजा बनसोडे आदी  उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार ; उपमुख्यमंत्र्यांकडून निलंबनाचा आदेश, राजकीय वर्तुळात खळबळ
पुढील बातमी
रायगड जिल्ह्यातील तीन आरोपी कारसह तासवडे टोल नाक्यावर ताब्यात; तळबीड पोलिसांची तत्पर कारवाई

संबंधित बातम्या