जामनगर : गुजरातच्या जामनगर मध्ये भारतीय वायुसेनेचा एक लढाऊ विमानाचा अपघात झाला आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सुवार्डा गावाच्या बाहेरील भागात घडली, जिथे जग्वार लढाऊ विमान कोसळले आणि त्याचे अनेक तुकडे झाले. अपघातानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. या अपघातात एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटने नंतरचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात पायलट जमिनीवर घायाळ स्थितीमध्ये पडलेला आहे आणि त्याच्या आसपास लोकांची गर्दी जमलेली आहे. विमानाचे तुकडे विखरलेले पडले आहेत आणि आग लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. एका पायलटच्या यात मृत्यू झाला तर एक पायलट गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वायूसेनेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला.
भारतीय वायुसेना (IAF) ने जग्वार फायटर क्रॅश होण्याचा कारण तांत्रिक बिघाडी सांगितलं आहे. उड्डाणादरम्यान पायलट ने ही तांत्रिक बिगडीला मात देत एअरफील्ड आणि स्थानिक लोकसंख्येचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच विमानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नात एका पायलटने आपला जीव गमावला तर दुसऱ्या वैमानिकावर जामनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जामनगरचे जिल्हाधिकारी केतन ठक्कर म्हणाले, ” जामनगर जिल्ह्यात व्हायसेनेचा एक विमान कोसळला आहे. एका पायलटला वाचवून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. हवाई दलाचे पथक, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर बचाव पथके घटनास्तळी उपस्थतीत होते. नागरी क्षेत्रावर परिणाम झालेला नाही. विमान मोकळ्या मैदानात कोसळले.”
मागील महिन्यात देखील हरियाणा मध्ये पंचकुलाच्या जवळ सिस्टम खरबीमुळे जग्वार लढाऊ विमान कोसळले होते. पायलटने विमानाला सुरक्षितपणे गर्दीच्या ठिकाणांपासून दूर नेण्यात यश मिळवले. हे विमान अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उड्डाणासाठी निघाले होते.