पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन; 'इन्कलाम जिंदाबाद, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो', ३ मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी

by Team Satara Today | published on : 24 July 2026


पुणे : इन्कलाम जिंदाबाद, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, भारत माता की जय, अशी घोषणाबाजी करत पुण्यात लाल महाल चौक येथे CJP आंदोलनासाठी हजारो युवक एकत्र आल्याचे दिसून आले. हातात तिरंगा, इस्तीफा दो चे फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा यावेळी निषेध करण्यात आला.  

दिल्लीतील आंदोलनानंतर देशातील अनेक राज्यात युवकांकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. तसेच मोर्चाही काढण्यात आला होता. या दोन्हीला महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यानंतर आज विद्यार्थ्यांकडून अनेक राज्यात आंदोलन सुरु झाले आहे. पुण्यातही हजारोंच्या संख्येने युवक या आंदोलन उतरल्याचे दिसून आले. पुण्यातील लाल महाल चौकात देशाचे झेंडे घेऊन भारत माता की जय, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इन्कलाम जिंदाबाद अशा घोषणा देत युवक सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. 

दरम्यान आज दिल्लीच्या कॉन्स्टीट्यूशन क्लबमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि 'कॉकरोच जनता पार्टी'च्या शिष्टमंडळात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सरकारने आमच्या प्रमुख तीन मागण्यांपैकी दोन मागण्यांवर अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या तिसऱ्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ मागितला आहे, असा दावा CJP कडून करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणे, धमकावणे बंद करा करा - राहुल गांधी ठाम, पोलीस हल्ल्यातील जखमी आंदोलकाला सर्वांसमोर आणले
पुढील बातमी
पेपरफुटीबाबत असलेल्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, नवीन कायदे आणून काय होणार?’, काँग्रेसचा सवाल

संबंधित बातम्या