12:02pm | Nov 08, 2024 |
सातारा : असंख्य विकासकामे करून संपूर्ण जावली तालुक्याचा कायापालट केला आहे. कामे करण्यासाठी ठेकेदार लागणारच. ठेकेदार काय माझे पाहुणे, नातेवाईक नाहीत. ज्यांनी कोयना पुनर्वसनमधील गोरगरीब लोकांना मिळालेल्या जमिनी कवडीमोल किमतीत बिल्डर्सच्या घशात घातल्या आणि त्यातून कमिशन खाल्ले अशी कमिशन एजंटगिरी चांगली का विकासकामं करणं चांगलं? याचा विचार जावलीकरांनी करावा. गोरगरीब जनतेच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या एजंटला जावलीकरांनी जावलीचा हिसका दाखवावा, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
वसंतगड, मेढा येथे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेत आ. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी खा. नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रवादीचे राजेंद्र लवंगारे, ह.भ.प. सुहास गिरी, माजी सभापती जयश्री गिरी, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, शिवसेनेचे एकनाथ ओंबळे, भाजपचे श्रीहरी गोळे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कांचन साळुंखे, रवी परामने, हणमंत पार्टे, पांडुरंग जवळ, दत्ता मर्ढेकर, शिवाजी देशमुख, प्रशांत तरडे, एकनाथ रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधींची कामे झाली आहेत. प्रत्येक काम दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना त्या- त्या वेळी केलेल्या आहेत. त्यामुळे विरोधी उमेदवाराने बेंबीच्या देठापासून कितीही ओरड केली तरी त्याच्या भूलथापांना जनता कदापि भुलणार नाही. जावली तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना कोयना पुनर्वनमधून ठाणे, रायगड आदी ठिकाणी जमिनी मिळाल्या. त्या जमिनी बिल्डर्सच्या घशात घालून स्वतःचे खिशे भरणाऱ्या कमिशन एजंटने गोरगरीब जनतेला देशोधडीला लावण्याचे पाप केले आहे आणि हा एजंट आता राजकारणात उतरला आहे हि दुर्दैवी बाब आहे. या बोगस शिवसैनिकाने हातात मशाल घेतली असली तरी तो २३ तारखेचा निकाल लागला कि शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार आहे. त्यामुळे खऱ्या, निष्ठावंत शिवसैनिकांनाही त्याच्यावर विश्वास नाही. हे पार्सल आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादीकडे परत पाठवायचे आहे. सर्व जावलीकरांनी मला मताधिक्याने विजयी करावे आणि भामट्या एजंटला चांगला हिसका दाखवावा, असे ते म्हणाले.
खा. नितीन पाटील, मानकुमरे, अशोक गायकवाड, रांजणे आदींनी आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले. ऍड. मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. विकास देशपांडे यांनी आभार मानले. सभेला जावली तालुक्यातील महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ, माता- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुहास गिरींसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
सभेत जावली पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी, जयश्री गिरी व त्यांचे सर्व समर्थक, शिवाजी देशमुख, पांडुरंग वाघ, प्रकाश चव्हाण, शंकर जवळ यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून आ. शिवेंद्रराजेंना जाहीर पाठिंबा दिला. मी कधीच बाबाराजेंपासून लांब गेलो नाही. मी कायम त्यांच्यासोबतच राहिलो आणि राहणार आहे. कुडाळ गटातून विक्रमी मताधिक्य बाबाराजेंना देणार, असे सुहार गिरी यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |