सातारा : सातारा शहर परिसरातून वेगवेगळ्या घटनेत दोनजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील सारडा कॉलनी, समता पार्क शेजारील राहत्या घरातून विजय प्रकाश मोरे (वय 18 वर्षे पूर्ण) हा दि. 7 रोजी बाहेर जावून येतो, असे म्हणून निघून गेला आहे. तो अद्यापही परत आला नाही. याबाबत आई गीता प्रकाश मोरे (वय 40) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार इष्टे तपास करत आहेत.
दुसर्या घटनेत, सदरबझारमधील रामकुंड येथील श्रीनाथ कॉलनीतील राहत्या घरातून एक 19 वर्षीय युवती दि. 7 रोजी घरात कोणास काहीही एक न सांगता निघून गेली आहे. याबाबत युवतीच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार यादव तपास करत आहेत.