सातारा : सातारा जिल्हयात दिनांक 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गोकुळअष्टमी, दहिहंडी, गणेश मुर्ती आगमन, गणेश मुर्ती विसर्जन, गणेशोत्सव असे उत्सव साजरे होत आहेत. उत्सवांमध्ये मिरवणुक प्रसंगी विविध गणेश मंडळे त्यांच्या वाद्यांमध्ये व स्टेरिओ सिस्टीमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझरबीम लाईट व प्रेशरमिडचा वापर करतात, यामुळे श्रवणयंत्रावर, डोळयांवर, हृदयास इजा होवुन त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही व अशी परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता तसेच रस्त्यावरुन जाणारे वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटुन अपघात घडून अनुचित प्रकार व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 8 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 6 वा. ते 6 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12 पर्यंत गोकुळअष्टमी, दहिहंडी, गणेश मुर्ती आगमन, गणेश मुर्ती विसर्जन मिरवणुकीत, कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाण, मार्गावर, रस्त्यावर कोणत्याही व्यक्ती, संस्था, कंपनी, सार्वजनिक मंडळे किंवा गणेश मंडळे यांना तसेच या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, सदस्य तसेच वाद्य मालक, चालक, व्यवस्थापक अथवा ताबाधारक यांनी प्लाझमा, बीम लाईट, लेझरबीम लाईट व प्रेशरमिड यांचा वापर करणार नाहीत अथवा उपयोगात आणू नये यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ प्रमाणे वापरास प्रतिबंध करत असल्याचे आदेश सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
6 सप्टेंबर अखेर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू
प्लाझमा, बीम लाईट, लेझरबीम लाईट व प्रेशरमिड यांच्या वापरावर बंदी : पोलीस अधीक्षक तुषार दोशी
by Team Satara Today | published on : 16 August 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
January 16, 2026
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी
January 16, 2026