बहुजन समाज पार्टी ओबीसी भाईचारा अध्यक्षपदी सोमनाथ पवार यांची निवड

बहुजन पार्टी माण विधानसभा अध्यक्ष गणेश थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार

by Team Satara Today | published on : 10 September 2025


पुसेसावळी, दि. १०  :  बहुजन समाज पार्टी माण विधानसभेच्या ओबीसी भाईचारा अध्यक्षपदी सोमनाथ रामचंद्र पवार यांची निवड करण्यात आली.बहुजन समाज पार्टी माण विधानसभा अध्यक्ष गणेश थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

मायणी येथे बहुजन समाज पार्टी बूथ आणि सेक्टरच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा प्रभारी संदेश वाघमारे, जिल्हा बामसेफ संयोजक राजेश पवार,माण विधानसभा कोषाध्यक्ष अनुज कांबळे यांची उपस्थिती होती.

सोमनाथ पवार म्हणाले, देशात बहुजन समाज पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेने काम करणारी एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे. देशात सामाजिक आणि राजकीय परिवर्तन करायचे असेल तर देशातील अनु जाती, अनु जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्यक लोकांनी नेहमी बहुजन समाज पार्टीचे काम केले पाहिजे. बहुजन समाजातील लोकांचे सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न सोडविण्याबरोबर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.

या बैठकीस सुरेश देशमुख, राहुल पवार, बाळू पवार, लालासो पवार, सिद्धनाथ देशमुख, किरण पवार, रावसो देशमुख, परशुराम जाधव, सतीश घुसाळे, रोहित देशमुख, भाऊसो पवार, अनिकेत देशमुख, व्यंकट देशमुख, अजय देशमुख, आकाश देशमुख, संजय घुसाळे, लक्ष्मण पवार, गणेश देशमुख, राजू पवार, धीरज जाधव, साहिल देशमुख, गणेश घुसाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वातंत्र्यलढ्यात प्रतिसरकारचे मोठे योगदान

संबंधित बातम्या