सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सुमित शंकर कांबळे रा. महागाव, ता. सातारा या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.