मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी

by Team Satara Today | published on : 17 December 2024


सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वर्ये तालुका सातारा येथील कन्हेर कॅनॉल येथे काशिनाथ धोंडीबा पाचंगे राहणार वर्ये, ता. सातारा यांना समीर काळे, सुरेश चव्हाण, समाधान काळे, विवेक चव्हाण, उदय काळे (पूर्ण नावे माहीत नाहीत) आणि इतर तीन अनोळखी (सर्व राहणार नवनाथ नगर, तालुका सातारा) यांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

दुसरी तक्रार विवेक मोहन काळे रा. नवनाथ नगर तालुका सातारा यांनी दिली आहे. त्यानुसार विवेक काळे यांना अजय मिठारे, रोहन लष्करे, काशिनाथ पाचंगे, हर्षद तांबोळी (पूर्ण नाव माहिती नाही) आणि इतर आठ ते दहा जणांनी (सर्व रा. इंदिरानगर, पानमळेवाडी, ता. सातारा) लोखंडी रॉडने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलाचे अपहरण
पुढील बातमी
मसाप, शाहुपुरी शाखेच्या अध्यक्षपदी नंदकुमार सावंत, कार्याध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्षपदी विक्रम पाटील

संबंधित बातम्या