सातारा : खेड येथे अज्ञात चोरट्यांनी 37 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेड, ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातील ३७ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना दि. ४ ते ७ जानेवारी या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी कृष्णाजी महादेव नलवडे (वय ६८, रा. खेड) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.