मुख्यमंत्री बाल अशिर्वाद नावाची योजनाच नाही : महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील

by Team Satara Today | published on : 22 July 2025


सातारा : सध्या सोशल मिडीयावर 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एका पालकाचा मृत्यू झाला आहे. बालकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटूंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत.  सदर अर्ज भरुन जिल्हा बाल संरक्षण कक्ष/जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे असा मजकूर येत असून काही पालक सदर योजनेच्या अनुषंगाने चौकशी करत आहेत.  परंतू  मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना माहिला व बालविकास विभागामार्फत राबविली जात नाही. 

लोकांनी यावर विश्वास ठेवू नये. अशा अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर तसेच अशा अफवा असलेल्या सोशल मिडीया पोस्टवर विश्वास ठेवू नये व आर्थिक फसवणूकीस बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वच्छ भारत अभियान व घनकचरा व्यवस्थापन उपक्रम मिशन मोडवर राबवावा : पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
भारतीय लष्कराला मिळाले शक्तिशाली Apache हेलिकॉप्टर

संबंधित बातम्या