एमआयडीसीत दोघांना मारहाण

by Team Satara Today | published on : 21 September 2024


सातारा : एमआयडीसीत दोघांना मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुन्या स्क्रॅपच्या लॉटवरुन आठ जणांनी दोघांना मारहाण केली. हा प्रकार दि. 20 रोजी एमआयडीसीतील महाराष्ट्र स्कुटर येथे घडला. या प्रकरणी सुंदरसिंग नारायणसिंग शेखावत (वय 58, रा. एमआयडीसी, मूळ रा. राजस्थान) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीसह अन्य एकाला शुक्रराज घाडगे, अक्षय चव्हाण, मोहम्मद शमी, कुमार क्षेत्री, सागर घाडगे, करण आडके, रवींद्र जाधव, रमेश जाधव यांनी मारहाण केली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किडगाव येथे घरफोडी
पुढील बातमी
न्यायाधीशांनीच स्वसहभागाने कोर्ट परिसरात राबविली स्वच्छता मोहीम

संबंधित बातम्या