शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या

सुमारे पावणे सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत; सहाजण ताब्यात

by Team Satara Today | published on : 12 September 2024


सातारा : शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या असून याप्रकरणी अलताप सय्यद पठाण (वय 24) रा.विहा मांडवा ता.पैठण जि.संभाजीनगर, रमेश बाबासाहेब काळे (वय 34) रा. येळंबघाट ता.जि.बीड, जान्हवी अंगद पवार (वय 28) रा.रामगव्हाण ता. अंबट जि.जालना, बरका सचिन पवार (वय 28) रा. वाडेगोद्री ता.अंबट जि.जालना, गवरी रामदास भोसले (वय 27) रा.गेवराई ता.जि.बीड, सुरेखा ज्ञानेश्वर काळे (वय 23) रा. वाडेगोद्री ता. अंबट जि.जालना या आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 6 लाख 44 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपूरी पोलीस ठाण्यात 18 ऑगस्ट 2023 रोजी चोरीची तक्रार प्राप्त झालेली होती. चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना सदरचा गुन्हा उघकीस आणण्याच्या सुचना दिल्या. 
8 सप्टेंबर रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गणपती उत्सव अनुषंगाने राजवाडा, मोती चौक, खणआळी, देवी चौक अशा परिसरात गर्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना 4 संशयित महिला फिरत असल्याचे दिसून आल्या. त्यांच्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना प्राप्त असलेले सी.सी.टी.व्ही फुटेज तपासल्यानंतर फुटेजमधील दोन महिला या फुटेजमधील असल्याचे खात्री झाल्याने महिला सहा.पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, प्रियांका बाबर व महिला अंमलदार यांची मदत घेऊन सदर ठिकाणी 4 संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने बाजार पेठेत फिरत असल्याचे सांगितले आणि आमच्याबरोबर आणखी 2 पुरुष साथीदार वाढे फाटा येथे चारचाकी वाहन घेवून थांबल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. यामधील 4 महिलांनी सन 2023 मध्ये चोरी केल्याचे कबूल केले.
या कारवाईमध्ये शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे, पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, निलेश काटकर, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली माने, धनश्री यादव, तनुजा शेख, शकुंतला पाटोळे, कोमल पवार यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाच दिवसाच्या बाप्पांना गौरीसह भावपूर्ण निरोप
पुढील बातमी
शाहूपुरी पोलीस ठाण्याचा गुन्हेगारांना मास्टर स्ट्रोक

संबंधित बातम्या