सुदानच्या पश्चिमेला असलेल्या मार्रा पर्वत क्षेत्रामध्ये ही घटना घडली आहे. भूस्खलन होऊन प्रचंड मोठा मातीचा मलबा खाली आला. यात संपूर्ण गाव गाडले गेले. या घटनेत फक्त एक लहान मुलगा वाचला असल्याची माहिती सुदान लष्कराने दिली.
पावसाचा कहर, नंतर मृत्यूचे तांडव
अब्देलवाहिद मोहम्मद नूर यांच्या नेतृत्वाखाली लिबरेशन मुव्हमेंटने एक निवेदन प्रसिद्ध करून याबद्दलची माहिती दिली आहे. सुदानच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस कोसळत आहे. पावसामुळे ही भूस्खलनाची घटना घडली.
३१ ऑगस्ट रोजी भूस्खलन झाले. संपूर्ण मातीचा ढिग गावावर कोसळला. त्यात सगळी घरे दबली गेली. पावसानंतर झालेल्या भूस्खलनाने मृत्यूने तांडव घातले. लिबरेशन मुव्हमेंटने संयुक्त राष्ट संघ आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे ढिगाऱ्याखाली मृत्यू झालेल्यांचे मृतदेह काढण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. अब्देलवाहिद मोहम्मद नूरच्या नेतृत्वाखाली संघटनेने दारफूर क्षेत्रावर ताबा घेतलेला आहे. त्याच भागात ही घटना घडली आहे.