महाबळेश्वर शहरातील जन्नी माता मंदिरातील चोरी केल्याप्रकरणी एकास नऊ महिने कारावासाची शिक्षा

by Team Satara Today | published on : 26 July 2026


महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील जन्नी माता मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवत नऊ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विठ्ठल कोंडीबा शेलार (वय ३४, रा. कोट्रोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) अशी शिक्षा सुनावल्याचे नाव आहे.

याबाबत अनिल मारुती लोहार (रा. महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ७ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री सुमारे साडेबाराच्या सुमारास आरोपी विठ्ठल कोंडीबा शेलार (वय ३४, रा. कोट्रोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) याने महाबळेश्वर हद्दीतील जन्नी माता मंदिराचे दरवाजाचे कुलूप व कडी फरशीच्या तुकड्याच्या साहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर दानपेटीचे कुलूप तोडून त्यामधील १५० रुपयांच्या रोकडची चोरी केली होती. या प्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आरोपीला दोषी ठरवून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८(२) अन्वये नऊ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार पी. आर. जाधव यांनी केला. या खटल्यात सरकारी वकील डी. एम. शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे (वाई विभाग), पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी विशेष मार्गदर्शन केले. खटल्यात एकूण चार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वरच्या पावसानेही यंदा तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला; कोयना धरणात ७१ टीएमसी पाणीसाठा
पुढील बातमी
खंडाळा तालुक्यात महामार्गावरील धनगरवाडी हद्दीत मालट्रकला लक्झरी बसने दिलेल्या धडकेत लक्झरीमधील १८ प्रवासी गंभीर जखमी

संबंधित बातम्या