सातारा : राज्यात महायुती असल्याने शिवसेना सातारा जिल्ह्यातही युती धर्माला बांधील आहे. उमेदवारी अर्ज भरण्याला दोन दिवस उरलेले असताना भाजपच्या नेत्यांकडून अद्याप समन्वयाचा कोणताही निरोप आलेला नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला मात्र नेते हजर नसल्यामुळे चर्चा होऊ शकली नाही. एकंदर परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक संभ्रमित आहे. महायुतीच्या घटक पक्षांनी जिल्ह्यात महायुतीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसेना सातारा जिल्ह्यातील सर्व जागा पूर्ण ताकतीने स्वबळावर लढेल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी दिला आहे.
भोसले यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या पत्रकात नमूद आहे की, राज्यात युती असताना आम्ही युती धर्म पळत आहे,, जिल्ह्यात नगरपरिषद ,, नगर पंचायत निवडणुका जोर धरत असताना सातारा शहरात देखील शिवसेना पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने काम करत आहे.
निवडणूक जाहिर झाल्या पासून एकदा सातारा शहराबाबत युतीचा पुढाकार घेऊन पालकमंत्री यांनी भाजप जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष यांची बैठक घेतली. त्या वेळी संबंधित मंत्री हजर नसल्याने आपण ते आल्यावर बसू असे पालकमंत्री यांना सांगितले व त्यानंतर परत अद्यापही कोणताही युतीबाबत निरोप आला नाही. त्या व्यतिरिक्त मित्र पक्षांच्या सातारा नगरपालिकां निवडणुकी बाबत नामांकित पंचतारांकित हॉटेल मध्ये मुलाखती झाल्या ,,अगदी नागराध्यश देखील भाजपचा होईल, अशा घोषणा झाल्या परंतु मित्र पक्षाला अजिबातच गृहीत धरले नाही. आता अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसात संपेल. परंतु दोन्ही राजेंच्या कडून किंवा भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या कढून अजूनही मित्र पक्षाला कोणताही निरोप आला नाही. मानसन्मानाने विचारपूस देखील नाही.
असे असल्यानंतर आमच्या शिवसेनेच्या इच्छुक कार्यकर्त्यांच्यात संभ्रमाची अवस्था निर्माण होत आहे. त्यामुळे वेळेत काही गोष्टी नाही झाल्या तर पक्षाचे नुकसान होईल ते असच चालू राहील तर आम्हला ही आमच्या पक्षाचे अस्तित्व दाखवण्याची वेळ आलीच तर आम्ही सातारा नगरीचा नगराध्यक्षपदाचा bउमेदवार व सर्व नगरसेवकांचे पदांचे उमेदवार आम्ही देऊ व त्याबाबत आम्ही पक्षातील दोन नंबरचे नेते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे तसा आग्रह धरू.
पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांच्या व संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली नागराध्यक्ष ते सर्व नगरसेवक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाने आम्ही निवडून आणू, असा इशारा शिंदे गट शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.