सातारा : समान नागरी समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत नागरिक, विविध संस्था आणि हितसंबंधी गटांच्या सूचना, हरकती व अभिप्राय जाणून घेण्यासाठी विभागीय स्तरावर जनसुनावणी आयोजित करण्यात येत आहे. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील नागरिक व संस्थांसाठी रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत जनसुनावणी होणार आहे. ही सुनावणी झुंबर हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी यांना सुनावणी कामी पुणे विभागीय आयुक्त यांचे कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष अथवा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे दुरदुश्यप्रणालीद्वारे निर्धारित वेळेपूर्वी 1 तास उपस्थित राहता येईल. तसेच ज्या नागरिकांना केवळ ऑनलाईन पध्दतीने आपले मत सादर करावयाचे आहे त्यांना महाराष्ट शासनाच्या https://ucc.maharashtra.gov.in या पोर्टलवर 37 मुद्यांची माहिती देता येईल, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी जाहीर प्रकटनाद्वारे केले आहे.
समान नागरी संहितेबाबत २९ नोव्हेंबरला साताऱ्यात जनसुनावणी; सूचना, हरकती व अभिप्राय नोंदविण्याची संधी
by Team Satara Today | published on : 25 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा