कराड : माजी केंद्रीय मंत्री स्व.आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व.प्रेमलाताई चव्हाण (काकी) या राजकारणातील आदर्श दाम्पत्य होते. दोघांचा स्मृती दिन 8 जुलै रोजी एकाच दिवशी असतो. दरवर्षी विविध उपक्रमांनी त्यांचा हा स्मृतिदिन साजरा केला जातो. आजही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी स्व. दाजीसाहेब व स्व. काकींसाहेब यांना अभिवादन करण्यासाठी कराड दक्षिण मधील तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
कर्तबगार माता-पित्याचा स्मृतिदिन एकाच तारखेला यावा, हा नियतिचा खेळ किती विलक्षण आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चारित्र्यसंपन्न आणि उच्च विद्याविभूषित नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे पिताश्री दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण आणि मातोश्री काकीसाहेब उर्फ प्रेमलाताई चव्हाण यांचा स्मृतिदिन ८ जुलै या एकाच तारखेला आहे. आनंदराव चव्हाण यांचा ५२ वा स्मृतिदिन जसा ८ जुलै रोजी आहे. त्याचदिवशी प्रेमलाकाकींचा २२ वा स्मृतिदिन त्याच दिवशी आहे. देशाच्या राजकारणात ज्या दाम्पत्यांनी अत्यंत चरित्र्यसंपन्न, सुसंस्कृत राजकारण केले, त्यामध्ये हे चव्हाण दाम्पत्य महाराष्ट्रात आदरणीय मानले जाते.
त्यांनी शेतीला उद्योगाचा दर्जा का दिला जात नाही,’ जर उद्योगपतीला त्याच्या उद्योगाच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे तर... शेती उत्पादकाला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार का नाही? उत्पादनासाठी होणारा खर्च आणि त्याला मिळणारे त्याचे मोल, याचा मेळ का बसत नाही? ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा का होत नाही? हे ७५ वर्षांपूर्वी शेतीचे मुलभूत प्रश्न उपस्थित केले होते. त्यात ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा झाला.देश आणि राज्याच्या राजकारणात आदर्श उभा करणाऱ्या या दाम्पत्याला अभिवादन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.