अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावर जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन

२०२५ च्या भव्य एक्स्पोच्या मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ

by Team Satara Today | published on : 05 September 2025


सातारा : सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे. यावर्षी मॅरेथॉनचे हे १४ वे वर्ष असून या मॅरेथॉनसाठी देशभरातून तब्बल ८,००० धावपटूंनी नोंदणी केली आहे.

यावर्षीचा “मॅरेथॉनचा एक्स्पो” शुक्रवार दि. १२ सप्टेंबर आणि शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात संपन्न होणार आहे.

या पार्श्वभूमीवर मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोच्या मंडप उभारणीचा शुभारंभ गुरुवार दि. ४ सप्टेंबर रोजी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जिवाजी मोहिते यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व भूमिपूजन करून सुरू करण्यात आला.

या प्रसंगी "जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन" संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, सचिव शैलेश ढवळीकर, "ची-रनिंग" प्रशिक्षक व संयोजन समिती सदस्य मिलिंद हळबे, तसेच समिती सदस्य श्री सागर निंबाळकर यांनीही श्रीफळ वाढवून या मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ केला. याप्रसंगी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार  महेंद्र (आबा) जाधव हेही उपस्थित होते.

विशेष म्हणजे, या वर्षी पहिल्यांदाच एक्स्पोचा हा भव्य मंडप  ‘जर्मन हँगर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारला जात असून याची जबाबदारी मंडप कॉन्ट्रॅक्टर  भाऊ भोसले यांनी स्वीकारली आहे.

या एक्स्पोमध्ये देशभरातील विविध नामांकित संस्था त्यांच्या उत्पादनांचे स्टॉल्स इथे लावणार असून या मॅरेथॉनमध्ये ज्यांनी भाग घेतला नसेल अशा सातारकर नागरिकांनीदेखील या भव्य एक्स्पोला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे व उपाध्यक्ष विशाल ढाणे यांनी संयुक्तपणे केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंबेदरे येथे घरफोडी
पुढील बातमी
ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’

संबंधित बातम्या