सातारा : राजवाडा परिसरात ५० वर्षीय अनोळखी महिला दि १ नोव्हेंबर २०२५ रोजी जखमी अवस्थेतआढळलेल्या अनोळखी महिलेचा मृत्यू . उपचारादरम्यान दि १९ डिसेंबर रोजी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती ससून रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर डॉ सी.व्ही.टिंगणे यांनी बंडगार्डन पोलिसांना दिली
यावेळी तिच्या डोक्याला आणि तोंडाला मार लागलेल्या अवस्थेत पोलिसांनी त्या महिलेला १०८ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान दि १९ डिसेंबर रोजी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती ससून रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर डॉ सी.व्ही.टिंगणे यांनी बंडगार्डन पोलिसांना दिली,पुणे पोलिसांनी याची माहिती टपालाद्वारे शाहूपुरी पोलिसांना दिली असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत.