सातारा : राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या अपमानकारक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. त्याचप्रमाणे यापुढे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह एकूणच महापुरुषांविषयी अवमान करणारे वक्तव्य किंवा लिखाण जो कोणी करेल त्याची जीभ किंवा हात छाटण्याची जबर शिक्षा करणारा कायदा लागू करावा, अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सर्वपक्षीय शिवप्रेमी सातारकर नागरिकांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर आणि सहका-यांनी दिलेल्या निवेदनात, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी, अभिनेता राहूल सोलापूरकर यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या अशा बेताल वक्तव्यामुळे जाती धर्मात अशांतता, वितुष्ट निर्माण होवून सामाजिक घटकांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. अशा प्रवृत्तीचा वेळीच कायद्यातील कठोर तरतुदींनुसार कारवाई वेळीच केली पाहीजे अन्यथा अश्या नतद्रष्ट आणि विकृत व्यक्तींच्या प्रवृत्तीमुळे सामाजिक शांतता भंग होण्याबरोबरच लोकांच्या मानसिकतेचा उद्रेक होवून अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
राहूल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोतच. तथापि विशेष करुन पोलिस विभाग आणि प्रशासनाने राहूल सोलापूरकर यांचेवर भारतीय न्याय संहिता आणि अन्य दंडनीय कायदयान्वये कठोर तरतुदींच्या आधारे युगपुरुष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचेबाबतीत निरर्थक वक्तव्य करुन, सामाजिक अशांतता निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करावा. एकंदरीत सर्वच महापुरुषांच्या बाबतीत अवमान करण्याच्या घटना पहाता याबाबत कठोर कारवाई होण्यासाठी राज्यशासनाने आणि केंद्रशासनाने जीभ किंवा हात छाटण्याची जबर शिक्षा असणारा स्वतंत्र कायदा पारित करावा जेणेकरुन अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडल्यास विनाविलंब विकृत मनोवृत्तीचा योग्य बंदोबस्त होवून अशा घटना जाणते-अजाणतेनेही घडवण्याचे धाडस कोणी करणार नाही.
श्री.राहूल सोलापूरकर यांच्या वक्तव्याविषयी समाजातील सर्वच घटकांच्या भावना अतिशय संतप्त आहेत. याविषयी तातडीने कारवाई न झाल्यास त्याचा उद्रेक होऊन काही अघटीत घडल्यास, त्यास सर्वस्वी श्री.राहूल सोलापूरकर हे व्यक्तीश: जबाबदार राहतील तसेच संबंधीत प्रशासन राहील याची कृपया नोंद घ्यावी. आपण विनविलंब, सातारकर शिवभक्तांच्या भावना शासनास कळवाव्यात आणि युध्दपातळीवर कार्यवाही करुन श्री.राहूल सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाई व्हावी.
निवेदन देताना, सुनील काटकर यांचसमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार दिलीप येळगांवकर, माजी जि.प.सदस्य भिमराव पाटील, नविआचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ.चित्रलेखा माने-कदम, माजी नगराध्यक्षा सौ.रंजना रावत, माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण व अमोल मोहिते, जेष्ठ पत्रकार व मार्गदर्शक हरिष पाटणे व शरद काटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे, सौ.गितांजली कदम, माजी नगरसेवक संजय शिंदे, माजी जि.प.सदस्य संदिपभाऊ शिंदे, माजी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, भाजपा सहकार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कडव, भाजपा युवा प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, डिसीसी संचालक सौ.कांचन साळुंखे, माजी नगराध्यक्ष नासिर शेख, रणजीत फाळके, सौ.कविता कचरे, बाळासाहेब राक्षे, भाजप सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, माजी नगरसेवक श्रीकांत आंबेकर, सौ.नंदिनी गायकवाड, सौ.वनिता पवार, सौ.सुवर्णा पाटील, रेणु येळगांवकर, सुदर्शन पाटस्कर, अमोल खुडे, माजी नगरसेवक विकास गोसावी, ॲड. विकास पवार, संजय पोतेकर, संभाजीनगर उपसरपंच काशिनाथ गोरड व सदस्य अनिल पिसाळ, शैलजा कदम, शरद जाधव, धनाजी पाटील, रवि माने, तात्या सावंत, अनिल शिंदे, वैभव शिंदे, दिलीप कुऱ्हाडे, उपाध्यक्ष आरपीआय प्रतीक गायकवाड, नंदकुमार यादव, आरपीआय जिल्हाध्यक्ष दादा ओहाळ, सुनेशा शहा, प्रशांत निंबाळकर, यांचेसह सर्व संघटनांचे आणि पक्षांचे पदाधिकारी शिवप्रेमी नागरीक उपस्थित होते.