बालगंधर्व नाट्यगृहात ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ आयोजन

अनेक चांगले चित्रपट येणार पाहता

पुणे : चित्रपटगृहामध्ये चांगल्या मराठी सिनेमाला जागा मिळत नसल्याने ते प्रदर्शित करता येत नव्हते, त्यामुळे आता नाट्यगृहांमध्ये सिनेमा दाखविण्याचा प्रयोग होऊ लागला आहे. पुण्यातच प्रथम हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे आता बालगंधर्व रंगमंदिरात २२ ते २३ जानेवारी दरम्यान ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ आयोजिला आहे. त्यात अनेक चांगले चित्रपट पाहता येणार आहेत.

मराठी चित्रपट निमात्यांच्या व कलाकारांच्या समस्या निवारण,तसेच व्यासपीठ निर्मिती आणि सर्वोतोपरी मदत, या बहुउद्देशीय संकल्पनेतून “मराठी चित्रपट असोसिएशन”ची उभारणी करण्यात आली. त्यातंर्गत हा महोत्सव आयोजिला आहे. एकीकडे मराठी चित्रपटांना पडदा मिळत नाही, तर दुसरीकडे नाटकांचे प्रयोग सतत होताना दिसत नाहीत,नाट्यगृह नेहमीच रिकामी राहतात. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रात तसेच पुण्यात नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काही चित्रपटांचे खेळही आम्ही पार पाडले आणि रसिकांचा त्याला उदंड प्रतिसादही लाभला.

या महोत्सवाच्या निमित्त आपल्या मराठी प्रेक्षकांना नाट्यगृहांमध्ये चित्रपट पाहण्याची एक सवय व्हावी आणि नाट्यगृहात अगदी मल्टिप्लेक्स प्रमाणेच चांगल्या उत्तम स्क्रीनवर आणि दर्जेदार साऊंड सिस्टिम मध्ये आपला मराठी चित्रपट हा पाहता येऊ शकतो एवढेच उद्दिष्ट या मराठी चित्रपट महोत्सव च्या निमित्त आम्ही केले आहे, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. 

या महोत्सवामध्ये आम्ही नुकतेच प्रदर्शित झालेले मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, पाणीपुरी, हॅशटॅग तदेव लग्नम, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, अल्याड पल्याड, श्री गणेशा हे चित्रपट ४९ रुपयात आम्ही दाखविणार आहोत. ही रक्कम अगदी सहजपणे सर्वसामान्य कुटुंबाला देखील परवडेल अशी आहे, अशी माहिती मराठी चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.

मराठी चित्रपट असोसिएशन तर्फे दिनांक २२ आणि २३ जानेवारी २०२५ ला बालगंधर्व रंगमंदिरपुणे येथे मराठी चित्रपट महोत्सव होत आहे. मराठी प्रेक्षकांना मल्टिप्लेक्स पेक्षा कमी दरामध्ये आपला मराठी चित्रपट हा पाहता येऊ शकतो, त्याचबरोबर मॉर्निंग असो, दुपारी असो, किंवा प्राईम टाईम असो अशा कुठल्याही वेळेत आणि अल्प दरात तो पाहता येऊ शकतो यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. - कौस्तुभ कुलकर्णी (सरचिटणीस, मराठी चित्रपट असोसिएशन)

मागील बातमी
8 व्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुरी
पुढील बातमी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची ताकत दाखवूया

संबंधित बातम्या