सातारा : साताऱ्यातील सदर बझार येथील एका इंग्लिश मीडियम शाळेत दारूच्या नशेत गोंधळ घालण्याचा प्रकार घडला.
हरी दिनकर बडेकर (वय ५६, रा. मंगळवारपेठ) यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत शाळेच्या स्टाफशी अरेरावी केली. या घटनेमुळे परिसरातील शांतता भंग झाली.
शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.