सातारा : कोयना धरण गुरुवारी दुपारी तीन वाजता ओव्हर फ्लो झाले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा १७ दिवस अगोदर धरण पूर्ण भरले आहे.
जिल्ह्यात यावर्षी मान्सूनच्या पावसावर एल निनोचे संकट कायम आहे. आतापर्यंतच्या पावसाळ्याचे तीन महिन्यात जिल्ह्यात १२ टक्के तूट आहे. तर माण तालुक्यात फक्त सरासरीच्या ५८ टक्के पाऊस झाला आहे. यावरून जिल्ह्यातील भीषणता जाणवते. मात्र पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे सर्वच प्रमुख सहा धरणे काठावर आहेत.
सध्या या धरणात १४८ टीएमसी पाणीसाठा आहे. प्रमुख सहा धरणे ९९ टक्क्यावर भरली आहेत. त्यातच आता तारळीनंतर कोयना धरण ओव्हर फ्लो झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता धरणात १०५. २५ टीएमसी पाणी साठा झाला. गेल्या वर्षी हे धरण २० सप्टेंबर रोजी पूर्ण भरले होते. कोयना धरण क्षेत्रात सध्या पाऊस असल्याने विसर्गात वाढ होणार आहे.
कोयना धरण ओव्हर फ्लो; धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा, मागील वर्षीपेक्षा यंदा १७ दिवस अगोदर धरण पूर्ण भरले
by Team Satara Today | published on : 03 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा