सातारा : गोडोली येथील हॉटेल लेक व्ह्यू शेजारी राहणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रंजना सुरेश सपकाळ (वय ५५) या महिला घरी एकट्याच राहत होत्या. राहत्या घरातील बाथरूममध्ये तोंडावर पडल्याने त्यांच्या कपाळाला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तोंडाला रक्त साचलेले असल्याचे पोलिसांना आढळून आले. याबाबत हर्षद भरत संकपाळ (वय ४५, रा. विलासपूर, गोडोली) यांनी पोलिसांना माहिती दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक बोराटे करत आहेत.