साहित्य संमेलन प्राथमिक नियोजनासाठी साहित्य संस्थांची बुधवारी बैठक

by Team Satara Today | published on : 14 June 2025


सातारा : सातारला तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ९९ वे संमेलन आयोजित करण्याचा मान मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनला मिळाला आहे. हे संमेलन सर्व क्षेत्रातील सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करायचे आहे. प्राथमिक नियोजनासाठी बुधवार दि.१८ जून रोजी साहित्य संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये दुपारी ३.३० वाजता होणार असल्याची माहिती मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

पत्रकात, जिल्हयातील साहित्य, सहकार, बँकिंग, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच सर्व क्षेत्राच्या सहकार्याने हे संमेलन यशस्वी करायचे आहे, त्यासाठी सर्व क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. बुधवारी दि. १८ जून रोजी साहित्य संस्थांची प्राथमिक नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक मसाप,पुणे चे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तरी जिल्हयातील साहित्य क्षेत्राशी संबंधित सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभागी व्हावे असे आवाहनही श्री.सावंत यांनी केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पावसाळ्यात कोकणात जाताय ! जरा जपून !!
पुढील बातमी
राज ठाकरेंच्या वाढदिवशी अभिनेत्री सायली संजीवची पोस्ट

संबंधित बातम्या