सातारा : शाहूनगरातील एसटी कॉलनीमधील पोवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्कॉर्पिओ कारची (एमएच ११ डीएन ४४) दुचाकीला धडक बसली. हा प्रकार दि. २४ रोजी घडला.
निखिल सतीश नलावडे (वय २४, रा. नलावडे कॉलनी, शाहूनगर, सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी स्कॉर्पिओच्या कारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. यात दुचाकीस्वार निखिल नलावडे व त्याची आई सारिका नलावडे या जखमी झाल्या. पोलीस हवालदार कारळे तपास करत आहेत.